Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनमुंबई

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये शिवजयंतीचा सोहळा उत्साहात संपन्न

अलिबाग प्रतिनिधी तुषार सर

0 4 8 2 9 4

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये शिवजयंतीचा सोहळा उत्साहात संपन्न

अलिबाग प्रतिनिधी तुषार सर

अलिबाग: बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्तानं मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी फळ्यावर अतिशय सुंदर अशी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची चित्राकृती रेखाटली.
सर्वप्रथम केंद्रशासनाच्या माझा भारत पदयात्रा कार्यक्रमांतर्गत इ. ५ वी ते इ. ९ वी व इ. ११ वी च्या सर्व विद्यार्थ्यांची शाळे जवळील परिसरातून ‘जय शिवाजी जय भारत’ ही पदयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.
त्यानंतर पुढील कार्यक्रम स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात संस्थेचे खजिनदार सुवर्ण कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विशाल पाटील सर व यतिश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला व सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले.
मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे यांनी प्रास्ताविकातून छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महती सांगितली.
त्यानंतर विशाल पाटील सर यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पोवाडा अतिशय सुंदर रित्या सादर केला.
त्याला यतिश शिंदे सर यांनी तितकीच सुंदर तबला साथ केली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महती सांगितली. इ. ९ वी अ मधील पायल म्हात्रे या विद्यार्थीनीने अतिशय उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे खजिनदार सुवर्ण कांबळी यांनी पारितोषिक देऊन तिचा गौरव केला.त्यानंतर दिलिप चव्हाण सर, धनराज फड सर व माजी सहाय्यक शिक्षक महादेव कोळी सर यांनी आपल्या भाषणातून छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महती सांगितली.

कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार सुवर्ण कांबळी, माजी सहाय्यक शिक्षक महादेव कोळी सर, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आशिष राणे सर यांनी उत्कृष्टरित्या केले तर आभार प्रदर्शन सुनील मोरे सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे