
0
4
8
2
9
0
पाईक संविधानाचे
बाबासाहेबांनी अती कष्ट
साहूनी लिहिले संविधान
सर्व देशांमध्ये आमचा आहे
अनमोल संविधान गंथ महान
आम्हा न्याय, हक्क अधिकार
बाबासाहेबांनी मिळवून दिले
आपल्या लाखो दलित बांधवांना
सन्मानाने जगण्यास शिकवले
स्वतंत्र, समता आणि बंधुता
मैत्रीचा मार्ग आम्हा दाखविला
आपले भविष्य घडविण्यासाठी
शिका,संघटित व्हा हा मंत्र दिला
वंदन या मानव मुक्ती दात्याला
राज्य आम्हा मिळाले लोकशाहीचे
संविधानानेच बळ दिले आम्हा
समान दर्जा शिक्षण रोजगाराचे
आम्ही आहोत पाईक संविधानाचे
सन्मान नित्य करू संविधानाचा
आम्ही नागरिक या भारत देशाचे
नाईनाट करू निश्चितच विषमतेचा
प्रतिमा नंदेश्वर
ता मूल, जि.चंद्रपूर
0
4
8
2
9
0



