जि. प. उ. प्रा. शाळा उमरी येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
'वाघाची मावशी' कार कवयित्री शर्मिला देशमुख यांचा सत्कार
जि. प. उ. प्रा. शाळा उमरी येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
‘वाघाची मावशी’ कार कवयित्री शर्मिला देशमुख यांचा सत्कार
चिमुकल्यांतर्फे विविध नाट्यछटा व नृत्यकलेचा आविष्कार
बिनधास्त न्यूज प्रतिनिधी बीड
केज/बीड. (दि १६) : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी येथे दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी बेडसकर साहेब ,चाटे साहेब ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रीय मु.अ.केदार सर,श्री पवार सर तालुकाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघटना,श्री ठोंबरे सर शिक्षकाची सहकारी पतसंस्था संचालक, सरपंच श्रीमती सुमनताई मुळे, राजकुमार मुळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, काकासाहेब मुळे शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, जाधव सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री इंगळे सर व सर्व शिक्षक वृंद , सर्व ग्रामस्थ उमरी आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनानंतर मान्यवरांचे सत्कार घेण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती जगदाळे मॅडम यांनी केले. श्रीमती देशमुख मॅडम यांच्या “वाघाची मावशी “हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे मार्गदर्शन व शुभेच्छा नंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्वागत गीत, नृत्याचे विविध प्रकार , आदिवासी नृत्य बेटी बचाव , मुलींची सुरक्षितता , मोबाईलचे दुष्परिणाम, आम्हाला आजी आजोबा हवेत हे नाटक, खंडोबाचे गीत , शिवरायांचे गीत, शिकव माझ्या लेकीला असे विविध 22 प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती देशमुख मॅडम व आभार प्रदर्शन श्री नाईक नवरे सर यांनी केले. श्री हुंबे सर,श्रीमती बांगर मॅडम ,श्रीमती शिंदे मॅडम ,श्रीमती मुंडे मॅडम आदि शिक्षक वृंद कार्यक्रमासाठी उपस्थित होते.



