
0
4
0
9
0
3
अजातशत्रू
स्वार्थी या दुनियेत आता
अजातशत्रू शक्य नाही
संपत्तीसाठी हाडवैर इथे
दुरावा पडला नात्यालाही…!!
द्वेष मत्सर फोफावत आहे
चालणाऱ्याचे खेचती पाय
संस्काराचा अभाव सर्वत्र
यश कोणाचेच बघवत नाय…!!
चांगले कोणाचे होऊ नये
हीच वाईट नित्य कामना
गोडबोल्या विश्वासघातकी
व्यक्तींशी सत्याचा सामना…!!
प्रगती होताच इथे कोणाची
शत्रू संख्या अचानक वाढते
दुष्ट छुपी रणनीती खेळण्यात
चोरटी अक्कल नित्य लढते…!!
सत्य प्रामाणिक व्यक्तीवर
बिना रॉकेलचे घेतात पेट
लबाड लांडग्याचा घोळका
नित्य सुरु असते गळाभेट …!!
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
0
4
0
9
0
3





