
0
4
0
9
0
3
दुरापास्त
विरहात सखे तुझ्या
दुरापास्त झाले हसणे
स्वप्नात तरी भेट सजनी
बसं झाले तुझे गं रूसणे
संजीवनी जगण्यास मिळते
तुझे गं आनंदी दिसणे
ठोका काळजाचा चुकेल
बंद कर उदास बसणे
आठवणीत सखे तुझ्या
दुरापास्त झालीय झोप
हृदयात रूजला प्रेमांकुर
आनंदानं वाढवू या रोप
वादळवारा गोंगावतोय
जीवन झाले दोलायमान
पवित्र आहे आपले मन
भाव अंतरीचे कर सन्मान
जुळून आले बंध रेशमाचे
प्रेमासं सदा मन आतुर
दुरापास्त असे निर्मळ मन
काढून टाक मनातील तण
संशयाचे भूत बसता मनी
अवहेलनेचे बनले धनी
कुचंबना ही नको तनाची
सखी माझी पवित्र मनाची
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
==========
0
4
0
9
0
3





