कविताकोकणनागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध
मनमौजी; प्रज्ञा सवदत्ती

0
4
8
2
9
3
मनमौजी
भुतकाळातल्या त्या खुणा
कधी कधी मनात डोकावतात
आठवांचा भवसागर लाटेसमान
मनाच्या किनाऱ्यावर आदळतात..
जगताना किती काळ गेलेला
बालपण ते म्हातारपण जगताना
असंख्य त्या खुणा सुखदु:खाच्या
मागे वळून परत एकदा बघताना ..
निरागस ते बालपण आनंदघन
स्मरणातले ते सोनेरी क्षण
निखळ, निर्मळ, निस्वार्थ
मनात असते फक्त आपले पण..
तारूण्याच्या उंबरठ्यावर मनमौजी
स्वप्नात गंधाळलेली पहाट
ध्येयसाध्यास कठीण परिश्रम
बनवायची नसते तिथे पळवाट..
जबाबदाऱ्यांना खांद्यावर घेऊन
स्वप्न साकार करण्याची धडपड
म्हातारपणात जगूया उत्साहात
शांत संयमी नको ती गडबड…
प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव-रायगड
==========
0
4
8
2
9
3



