काय सांगताय..? आता..भाजपाला अजित पवार नकोय..?
काय सांगताय..? आता..भाजपाला अजित पवार नकोय..?
लोकसभेत ‘नापास’ झाल्याचा परिणाम
मुंबई: राजकारणात सर्व ‘आलबेल’ असतय असे कदापि शक्य नाही. कोणताही पक्ष असो तो शत्रू अथवा मित्र नसतो. परंतु ज्याचा दबदबा कायम असतो त्याचे पक्षात व युतीत वजनही असतं. लोकशाहीच्या रणसंग्राम परीक्षेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘नापास’ झाल्याने याचा परिणाम त्यांच्या सत्तेत असलेल्या पदावर होणार असल्याची माहिती सूत्राकडून समजतेय.
महायुतीत भाजप आमदारांना आता अजित पवार नकोसे झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे म्हटले जात आहे. अजित पवारांना सोबत ठेवण्याबात फेरविचार करण्याची मागणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचे भाजप आमदारांचे मत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुन्हा विचार करावा अशी मागणी करण्यात येऊ लागल्याची चर्चा आहे. अजित पवार हे सत्तेत कायम राहतील की बाहेरची वाट धरतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





