जे. एस. एम. महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
जे. एस. एम. महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग : (दि.2/10/2026) जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या महान कार्याचे, विचारांचे आणि देशाच्या स्वातंत्र्य व विकासासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. Adv. डॉ. गौतम पाटील यांनी सर्वांना महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, पर्यवेक्षक श्री. अजय सावंत, ग्रंथपाल श्री. सुबोध डहाके, कार्यालय अधीक्षक श्री. राजेंद्र शेलार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


