Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनवी दिल्लीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकिय

“भारतीय संविधान- सद्य आणि भविष्यातील दृष्टीकोन” या विषयाची परिषद पुण्यात

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

भारतीय संविधान- सद्य आणि भविष्यातील दृष्टीकोन” या विषयाची परिषद पुण्यात

बिहारचे राज्यपाल मा.आरिफ महमद खान यांच्या हस्ते उद्घाटन

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

पुणे.दि.13: (प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत “भारतीय संविधान बदलण्यात येणार”, असा एक मोठा मुद्दा विरोधकांनी प्रचारामध्ये घेतला होता, त्यावर बरीच चर्चा झाली. तेव्हापासून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर लिखीत संविधानाबद्दल जनमानसात विशेषतः तरूण पिढीत एक जिज्ञासा निर्माण झालेली दिसते. या अनुषंगाने संविधाना विषयी अधिक जनजागृती होण्याच्या उद्देशाने ” प्रबोधन मंच,” पुणे आणि “डीईएस नवलमल फिरोदिया लाॅ काॅलेज” यांनी संयुक्तपणे “भारतीय संविधान सद्यस्थिती आणि भविष्यातील दृष्टीकोन या विषयाची एक महत्वपूर्ण परिषद आयोजित केली आहे.

शनिवार दि. 14 व 15 फेब्रुवारी रोजी
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटर येथे भरणा-या या दोन दिवसीय परिषदेचे उदघाटन शुक्रवार दि.14 रोजी सकाळी 10 वाजता बिहारचे राज्यपाल महामहिम आरीफ महंमद खान यांचे हस्ते होणार आहे. यावेळी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती शांतीश्री पंडित यांचे प्रमुख व्याख्यान होईल. परिषदेचा समारोप शनिवार दि. 15 फेब्रु. रोजी दुपारी 3.00 वाजता निवृत्त न्यायाधिश मा. अंबादास जोशी यांच्या “भविष्यात भारतीय संविधानापुढील आव्हाने” या विषयाच्या व्याख्यानाने होईल, अशी माहिती प्रबोधन मंचाचे अध्यक्ष श्री. हरीभाऊ मिरासदार यांनी दिली.

मंचाचे सहसंयोजक श्री. अजय महाजन यांनी ही परिषद सर्वांसाठी खुली असून संविधान जाणून घेण्यास ईच्छुक असलेल्यांनी परिषदेस मोठ्या संख्येने आवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे