
0
5
7
4
4
8
आम्ही आमचे आधार
आम्ही आमचे आधार
स्वप्न पूर्ण करणारी माता
भविष्याच्या अंतरंगातील साथ
शिक्षण देशाचे भवितव्यता
मानसन्मान ज्ञानाची ज्योत
जगण्यातून जीवन घडवणारा
तत्त्वातून मूल्ये फुलवणारा
जीवनाचा भवसागर फुलवणारा
आम्ही असो आमचेच आधार
पूर्वजन्मीचे पुण्य कामी येते
सुखदुःख भरले जीवन आपले
श्वासाचे अंतर वाढवत जाते
इथेच भोगते येथेच फेडती
जैसे कर्म तैसे फळ मिळते
भविष्य येथे ना कुणा कळती
रोज आयुष्य परीक्षा घेते
आम्ही आमचे आधार होतो
तो चालवेल तसा आपण चालतो
जीवन मोहात सर्व गुंतत जातो
प्रवास संपता एकटेच निघतो
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
0
5
7
4
4
8



