Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

अंगत पंगत

मीनाक्षी काटकर दारव्हा, जि.यवतमाळ

0 5 4 7 7 9

अंगत पंगत

अंगत पंगत बसली छान
सशाने आणला गाजराचा हलवा
वाढला सगळ्यांना थोडा थोडा
सगळ्यांना जास्त हवा हवा

अंगत पंगत बसली छान
माकडाने आणले केळांचे शिकरण
खायला दिले मोठे चमचे
वाट्या दिल्या भरून भरून

अंगत पंगत बसली छान
मांजरीने आणली कवळ्याची खीर
पातेले घेऊन बसली जवळ
उंदरांना म्हणाली मागे फिर

अंगत पंगत बसली छान
हरणाने आणली बाजरीची भाकरी
सगळ्यांना वाढली एक एक
त्यावर दिली चटणी भारी

अंगत पंगत बसली छान
जेवण झाले मस्त
उरलेले सगळे अन्न
उंदीर मामांनी केले फस्त

मीनाक्षी काटकर
दारव्हा, जि.यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 7 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे