तक्षशिला बुद्ध विहार स्वप्नजा गार्डन येथे बुद्ध जंयती उत्साहात
बिनधास्त न्यूज, शहर प्रतिनिधी
तक्षशिला बुद्ध विहार स्वप्नजा गार्डन येथे बुद्ध जंयती उत्साहात
बिनधास्त न्यूज, शहर प्रतिनिधी
नांदेड: शहरात दिनांक 12 मे 2025
तक्षशिला बुद्ध विहार स्वप्नजा गार्डन नांदेड येथे तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ सत्रात अशोक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली, दीपक खंदारे साहेब यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. श्रीराम वाघमारे साहेब यांनी प्रस्तावित केले तर प्राध्यापक गायकवाड साहेब यांनी आजच्या तरुणांनी व्यवसाय उभे केली पाहिजे. असे सांगितले तर क्षणाक्षणाचा आनंद घेतला पाहिजे असे सुद्धा म्हणाले आनंद हा पैशामध्ये नाही तर आनंद हा समाधानामध्ये आहे असे म्हणाले.
सायंकाळच्या सत्रात महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन करून अशोक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले प्रास्ताविक करताना श्रीरंग वाघमारे म्हणाले की बुद्ध धम्म हा सांगून जमत नाही तर कृतीत आला पाहिजे आचरणामधून दिसला पाहिजे. प्रत्येकाने काये ने ,वाचे ने , मनाने वागण्याची गरज आहे .डॉ. दिलीप शृंगारपुतळे म्हणाले की, आजही तथागत बुद्धांचे विचार अखिल मानव कल्याणाचे आहेत आणि जग ते अनुसरत आहेत. अनेकांनी बुद्ध धम्म स्वीकारला आणि दुःख मुक्त झाले त्याप्रमाणे मन निर्मळ पाहिजे असे ते म्हणाले
डॉ.राजेंद्र गोणारकर म्हणाले की
तथागत बुद्धांचे विचार विश्व कल्याणकारी आहेत. प्रत्येकाने तो अनुसरला पाहिजे स्वतःचं कल्याण केलं पाहिजे, दुःख मुक्त झालं पाहिजे आणि आनंदी जीवन जगले पाहिजे. यासाठी कोणी शाबासकी देण्याची गरज नाही तर तो अंतर्मनातून सुखी झाला पाहिजे. प्रा.अनिल थोरात सर यांनी बुद्ध गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले. मंचावर प्रा. अशोक कांबळे अशोक पंडित.श्रीरंग वाघमारे शामरावजी कवडे.डॉ दिलीप शृंगारपुतळे, डॉ.राजेंद्र गोणारकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम टी वाघमारे यांनी केले तर सावळीराम मगरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश वाठोरे, दत्ताजी भोसले, चक्के सर,कैलास पोहरे, सुगंधे , सर बिऱ्हाडे सर किशनराव खराडे, भारत वाठोरे, गौतम वाघमारे, माधव जोंधळे, प्रकाश गायकवाड, ढवळे साहेब, भारत तुळसे, मुन सर, बौद्ध उपासक ,उपाशीका, बालक बालिका यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढली व शेवटी खीर दान ने कार्यक्रमाची सांगता झाली.



