Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनगोंदियानागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

पावसाच्या सरींत तिरंग्याचा अभिमान, स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष महान!

प्रा. तारका रूखमोडे अर्जुनी/ मोर, जि. गोंदिया

0 5 9 4 1 4

पावसाच्या सरींत तिरंग्याचा अभिमान, स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष महान!

न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अर्जुनी/मोर: न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पावसाच्या रिमझिम सरींत मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष गौतम साखरे, ध्वजारोहक ओमप्रकाशसिंह पवार, प्रा. सुरज मोटघरे,प्रमुख अतिथी नितेश क्षीरसागर , प्रा.तारका रुखमोडे उपस्थित होते. पावसाची पर्वा न करता विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आली. ध्वजारोहण शाळा समितीचे सचिव ओमप्रकाशसिंह पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तिरंगा डौलाने फडकताच परिसरात देशभक्तीचा उत्साह संचारला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले. यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व आकर्षक कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तालबद्ध संचलन, शिस्त आणि एकजुटीचे उत्कृष्ट दर्शन विद्यार्थ्यांच्या कवायतीतून घडले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, देशभक्ती, राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी आणि विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी प्रभावी भाषणे सादर केली. यावेळी ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला. तसेच साक्षरता शपथ व व्यसनमुक्ती शपथ घेऊन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला.

शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये घेण्यात आलेल्या International Maths Olympiad स्पर्धेत राज्यस्तरावर ११ वी रँक प्राप्त करणाऱ्या ‘नक्ष लीलाधर डेकाटे’ या गुणवंत विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याला मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थितांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान ओमप्रकाशसिंह पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना जोपासून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच व्यसनमुक्त समाज आणि साक्षर समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने आपली भूमिका बजावावी, असा संदेश दिला. अध्यापक सागर जांभुळकर यांनी कार्यक्रमाचे संचालन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

पावसाच्या रिमझिम सरी, डौलाने फडकणारा तिरंगा, विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध कवायत, प्रभावी भाषणे, गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव आणि प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा उत्साहपूर्ण व अविस्मरणीय ठरला. कर्तव्यदक्ष पालकांनी भर पावसातही उपस्थित राहून तिरंग्यास मानवंदना दिली.

प्रा. तारका रूखमोडे
अर्जुनी/ मोर, जि. गोंदिया
==============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे