0
4
8
2
9
3
सुखाच्या शोधात
स्वप्नी सुखाचे चांदणे दिसले
लाजून संदिग्ध मलाच हसले
आसवांनी कधी दुःख न पाहिले
सुखाच्या शोधात मी निघाले
स्वप्न सारे सत्यात उतरले
आनंदाने दारी उभा राहिले
निद्रेनेही पहाटेकडे डोळे लावले
सुखाच्या शोधात मी निघाले
कर्तुत्वाने सारे कोडे सोडवले
तुझ्या डोळ्यांत मलाच पाहिले
आयुष्य तुझ्याच चरणी वाहिले
सुखाच्या शोधात मी निघाले
कधी आशेने,कधी लाजून हसले
मनातले भाव डोळ्यात कधी न दिसले
तू ही कधी का नाही पाहिले
सुखाच्या शोधात मी निघाले
तडजोड करीत आयुष्याची
नाते सारेच विरू लागले
करता जुळवाजुवळ संसाराची
स्वप्ने सारे जणू मरू लागले
अश्विनी आनंदराव जगदाळे
ता.केज,जि.बीड
=========
0
4
8
2
9
3



