Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

तंबाखूमुक्त शाळा जनजागृतीपर स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 7

तंबाखूमुक्त शाळा जनजागृतीपर स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये शासकीय जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्यामार्फत राष्ट्रीय तंबाखूमुक्त कार्यक्रमांतर्गत तंबाखू मुक्त शाळा जनजागृती पर स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये इ. ५ वी ते इ. ७ वी गटासाठी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा तर इ. ८ वी ते इ. १० वी गटासाठी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.

यामध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

*इ. ५ वी ते इ. ७ वी गट-* *चित्रकला स्पर्धा–*
*प्रथम क्रमांक–* मयेकर साईश सचिन [ इ. ७ वी ]
*द्वितीय क्रमांक–* कवळे सई संदीप [ इ. ६ वी ]
*इ. ५ वी ते इ. ७ वी गट–* *निबंध स्पर्धा–*
*प्रथम क्रमांक–* नाईक गायत्री प्रसाद [ इ. ७ वी ]
*द्वितीय क्रमांक–* कोळी सैयाली दिपक [ इ. ५ वी ]
*इ. ८ वी ते इ. १० वी गट–* *वक्तृत्व स्पर्धा–*
*प्रथम क्रमांक–* म्हात्रे पायल संजय [ इ. ९ वी अ ]
*द्वितीय क्रमांक–* म्हात्रे रक्षिता अमरेश [ इ. ८ वी अ ]
*इ. ८ वी ते इ. १० वी गट–* *निबंध स्पर्धा–*
*प्रथम क्रमांक–* पूरो कार्तिकी अभय [ इ. १० वी अ ]
*द्वितीय क्रमांक–* पाटील दिव्या सदानंद [ इ. ९ वी अ ]

स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बुधवार दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी शासकीय जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्या तर्फे पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ.सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे