ई-पेपरकवितागोंदियानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
पांढरा हत्ती
0
4
8
2
8
4
पांढरा हत्ती
स्वतःच्या कामाला
लावतो कार्यकर्त्याला
देऊन आश्वासन
मत मागतो मतदाराला
पांढऱ्या हत्तीचा
पांढरा वेशभूषा
त्याच्यावर भरोसा
राहते लोकांची आशा
राजकीय हत्ती
तोच पांढरा हत्ती
निवडून येताच
करत असतो अती
सारा माल सुततो
पोटभर खातो
गरीब बिचारा
आश लावून असतो
पांढरा हत्ती
काळ्या मनाचा
खाना त्याचा
जणू वाळल्या पानाचा
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
0
4
8
2
8
4



