ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
तेजस्विता
कु. साक्षी दत्तात्रय देसाई ता. दौंड, जि. पुणे

0
5
9
0
3
4
तेजस्विता
संघर्षाच्या दिव्यात तिने
ज्ञानाची ज्योत पेटवली,
दगडगोटे सोसले पण
शिक्षणाची वाट नटवली…
मानवतेची दिशा दाखवू
निश्चय तिने आखला,
जातीभेद नका करू
समानतेचा मार्ग दाखवला…
स्वावलंबी केलं मुलींना
कर्मठ लोकही हारली,
अन्यायाच्या छाताडावर बसून
पहिली शिक्षिका ठरली…
ज्ञानाची ती आई
जणू सावित्री बाई,
संजीवनी या लेखनाची
खूपच प्रेरणादायी…
शाळेच्या मंदिराला
ज्ञानाची फुले वाहिली,
तेजस्विता त्या सावित्रीची
अजूनही झळकत राहिली…
कु. साक्षी दत्तात्रय देसाई
ता. दौंड, जि. पुणे
0
5
9
0
3
4



