डॉ बळवंत भोयर साहित्य संस्कृती कृतार्थ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

डॉ बळवंत भोयर साहित्य संस्कृती कृतार्थ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
नागपूर: सुप्रसिद्ध कवी, लेखक, समीक्षक तसेच रसिकराज साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ बळवंत भोयर यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ भालचंद्र नेमाडे सरांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय स्पंदन साहित्य संस्कृती कृतार्थ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ बळवंत भोयर हे कामगार जाणिवेचे व ग्रामीण जीवनाचे सजग भाष्यकार व परिवर्तनवादी लेखक आहेत, त्यांचे एकूण १७पुस्तके, १२०साहित्यिकांच्या मुलाखती ११जिल्ह्याचे दूरदर्शन वरील माहिती पट, २१४देशाची मुद्रा व नाणी यांचा संग्रह ११०० कविता स्वतःच्या एवढी साहित्य संपदा त्यांच्या जवळ आहे.
भोयर यांना यापूर्वी केंद्रशासनाचा एक, राज्यशासनाचे दोन, इतर मान्यताप्राप्त संस्थेचे एकूण ७६ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते पुरोगामी व परिवर्तन चळवळीशी संबधित आहेत. नव्या वजुन्या संस्कृतीशी. नेणीव मांडणारे विचारवंत आहे. त्यांनी उच्च शिक्षण घेतले असून २१विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, पद्मश्री डॉ भालचंद्र नेमाडे सरांच्या शुभ हस्ते स्पंदन कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रख्यात कवी व समीक्षक डॉ बळवंत भोयर यांना स्पंदन साहित्य संस्कृती कृतार्थ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ शरद निंबाळकर, संस्थेचे अध्यक्ष श्री पांडुरंग सोनवणे, डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी, पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे, श्री प्रफुल्ल शिलेदार आदी ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते.



