Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरपरभणीपरीक्षण लेखमराठवाडासाहित्यगंध

“ऋणनिर्देश, आभाराचे दोन शब्द”; बी. एस. गायकवाड

घेऊ या 'भेट मराठी मनाची' ७ मे रोजी

0 4 8 2 9 4

“ऋणनिर्देश, आभाराचे दोन शब्द”; बी. एस. गायकवाड

घेऊ या ‘भेट मराठी मनाची’ ७ मे रोजी

परवा मोबाईल पहात असताना,राहुल सरांचा मॅसेज आला. “तुमचा फोटो पाठवा”, वाचून खूप आनंद झाला. दोन तीन काव्य प्रकारात लिहिले होते. नेमकी कुठे वर्णी लागेल, विचार मनी येऊन गेला. काही वेळातच ‘पंचनामा’ या काव्य रचनेचे पोस्टर ‘आजची सर्वोत्कृष्ट रचना’ या सदरात काव्य समूहात झळकले. पाहून खूप आनंद झाला. काहीजण लिहायचे म्हणून लिहत असतीलही पण फोटो मागणी करूनही फोटो पाठवत नाही ही खंत एखाद्या समूहात कुणाचेही पोस्टर नसले की वाटते, खरच आपण आदर्श वाचक आहोत का? प्रश्न प्रत्येकांच्या समस्येचा आहे.

‘पंचनामा’ या शब्दाची उपयोगिता व व्याप्ती तशी वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या संदर्भाने वापरली जाते. खून दरोडा, अन्याय, अत्याचार, अपघात दुर्घटना, नैसर्गिक संकट, त्यात अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी, महापूर व त्यामुळे होणारे नुकसान भरपाई व उपाययोजना करण्यासाठी करावयाचा पंचनामा. पण जगाचा पोशिंदा, बळीराजा याची अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची व्यथा मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला. आणि तो परीक्षकास भावला. व माझी रचना सर्वोत्कृष्ट रचना म्हणून सन्मानित करण्यात आली.

त्याबद्दल समूहाचे सर्वेसर्वा, मुख्य प्रशासक आदरणीय राहुल दादा, संस्थेच्या सचिव आदरणीय पल्लवीताई, मुख्य परीक्षक सविताताई, ज्येष्ठ परीक्षक वैशालीताई, तारका ताई, स्वातीताई, शर्मिलाताई, प्रतिमाताई, तसेच संग्राम दादा, विष्णू दादा, अरविंद सर, हंसराज खोब्रागडे सर, अशोकजी लांडगे सर, आपणा सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद. तसेच अभिनंदनीय शुभेच्छांची कौतुकाची थाप देऊन प्रोत्साहित करणाऱ्या ताई, दादा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझी कोरोना काळात समूहाशी नाळ जोडल्या गेली आणि समूहात आल्यापासून मला खूप काही भरभरून मिळाले आहे. व्यस्ततेमुळे खूपदा इच्छा असूनही व्यक्त होता येत नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

माझे अहोभाग्य आहे की, ७ मे रोजी छ. संभाजीनगर येथे मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा ‘काव्य प्रकाशन सोहळा’ व काव्यवाचन स्पर्धेत सहभागी होतांना ,सलग तीनही वर्षी सहभागी होता येत आहे. त्यात यापूर्वी लातूर व बुलढाणा येथे सहभागी होता आले. या होत असलेल्या अभूतपूर्व सोहळ्यास सर्व मान्यवर कवी, कवयित्री ताई, दादा आपण उपस्थित राहून नयनरम्य सोहळ्याचे साक्षीदार व्हावे. ही विनंती. पुनश्च एकदा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करून तूर्तास थांबतो.

कवीवर्य बी एस गायकवाड
पालम,परभणी
©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे