
0
5
7
8
9
8
ज्ञानप्रकाश
अक्षरांच्या दीपातून
चेतना जागू दे
विचरांच्या पंखांना
नवे नभ लाभू दे
पुस्तकांच्या सान्निध्यात
स्वप्ने फुलू दे
अनुभवांच्या शिदोरीने
वाट नवी खुलू दे
विज्ञानाची दृष्टी घेऊन
सत्य उमलू दे
मानवतेच्या स्पर्शातून
जीवन फुलू दे
श्रम, विवेक, करुणेची
ज्योत सतत तेवू दे
प्रत्येकाच्या अंतरंगात
ज्ञानगंगा वाहू दे
ज्ञानप्रकाश लाभला की
जीवन धन्य होते
अंधाराच्या प्रत्येक क्षणी
आशेचे गीत गाते
प्रांजली जोशी
विरार, जि.पालघर
0
5
7
8
9
8



