Breaking
विदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 3

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🌤️विषय : आम्ही झाडखाऊ🌤️*
*🔹गुरूवार : ११ / १२ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक १९६ साठी लवकर साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*आम्ही झाडखाऊ*

*कृतज्ञपणा दिला सोडून*
*कृतघ्न झालो कसे भाऊ*
*माथी वृक्षतोडीचे पातक*
*झालोत आम्ही झाडखाऊ*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🟢🍃🟢♾️♾️♾️♾️
*आम्ही झाड खाऊ*

निष्ठुर आम्ही झाड खाऊ
झाडावर भराभर घाव घालतो
वृक्ष तरी दाट सावली देतो
कृतघ्न माणूस उपकार विसरतो

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🟢🍃🟢♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आम्ही झाडखाऊ*

झालो आहोत आम्ही झाडखाऊ
बेदरकारपणे वृक्ष तोडतो
मागचा पुढचा विचार सोडून
निसर्गाचा समतोल बिघडवतो.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🟢🍃🟢♾️♾️♾️♾️
*आम्ही झाड खाऊ*

झाड असे सा-या ऋतूंचा राग
पावसाळ्याची तालबद्ध जाग
आम्ही झाड खाऊ तोडतो भाग
उरते मग सर्वत्र उकाड्याची आग

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🟢🍃🟢♾️♾️♾️♾️
*आम्ही झाडखाऊ*

कुणी कितीही समजवा
मुळातच आंम्ही आगाऊ
सावली देई त्याला तोडू
आहोत आंम्ही झाडखाऊ..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🟢🍃🟢♾️♾️♾️♾️
*आम्ही ‘झाड’ खाऊ*

जो देतो संसाराची शिदोरी
त्यावरच करतो आम्ही कुरघोडी
कृतघ्न आम्ही ‘झाड’ खाऊ
विस्कटवितो निसर्गाची घडी

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🟢🍃🟢♾️♾️♾️♾️
*आम्ही झाडखाऊ*

रणरणत्या उन्हात विसावा देतो
प्राणवायू सोडून जीवन फुलवितो
उन , वारा , पाऊस बिनतक्रार सोसतो
आम्ही झाडखाऊ वृक्षतोड करतो

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीच शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🟢🍃🟢♾️♾️♾️♾️
*आम्ही झाड खाऊ*

आम्ही झाड खाऊ झालोय बेदरकार
झाडांच्या मुळावर करतोय वार
निसर्गाचा मांडलाय अध्धपात
आपल्याच भविष्याचा करतो घात..

“*सौ सुरेखा कोरे नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🟢🍃🟢♾️♾️♾️
*आम्ही झाड खाऊ*

झाड तोडून थकवा आला
तुटलेल्या झाडानेच आश्रय दिला
आम्ही झाड खाऊ कपाळकरंटे
स्वतः च्याच नशिबावर घातला घाला

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🟢🍃🟢♾️♾️♾️♾️
*आम्ही झाडं खाऊ*

बहरलेला वृक्ष डेरेदार
देतो आपणास शीतल छाया
आम्ही झाडं खाऊ घावं करतो
जे आपल्यावर करतात असीम माया.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे