Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरमहाराष्ट्रविदर्भ

आवडत्या आदर्श शिक्षिकेच्या बदलीने विद्यार्थी झाले भावूक

रजत डेकाटे, प्रतिनिधी मालेवाडा

0 4 8 2 9 0

आवडत्या आदर्श शिक्षिकेच्या बदलीने विद्यार्थी झाले भावूक

शिक्षिका व माजी विद्यार्थीनी गळ्यात-गळे टाकून रडल्या

रजत डेकाटे, प्रतिनिधी मालेवाडा

मालेवाडा/ भिवापूर: (दि १६): नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील व आदर्श शिक्षिका ‘शीला रोडे’ यांची प्रशासकीय बदली झाली. जेमतेम ही बातमी आजी-माजी विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांच्या कानावर वाऱ्यासारखी पसरायला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून गावातील अनेकांनी शिक्षिका शीला रोडे यांची भेट घेऊन विचारपूस करीत, त्यांना बदली थांबवा असे सांगितले होते.

यावेळी त्या म्हणाल्या ही बदली प्रशासकीय आहे. थांबवता येत नाही आणि व ते शक्य नाही असे शिक्षिका रोडे म्हणाल्या होत्या. अखेर तो दिवस आला आणि क्षणातच मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत भावनिक क्षण दिसून आला. एकीकडे शिक्षिका व माजी विद्यार्थीनीं गळ्यात-गळे टाकून रडू लागल्या.दिवसभर शिक्षिका रोडे यांच्या चेहऱ्यावर अश्रू झळकत होते.

मालेवाडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना आवडत्या शिक्षिकेने पेन व बुक इतर साहित्य वाटप केले, तर शाळेतील शिक्षकवर्गाने शिक्षिका शिला रोडे यांना भेटवस्तू दिल्या.

त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन शाळेच्या रंगरंगोटीचा प्रस्ताव सामोर ठेवला होता. यात त्या शिक्षिकेच्या कार्याला मेजवानी देत शाळा व्यवस्थापन समितीने त्यांच्या कार्याची दखल घेत दर शनिवारला लोकवर्गणीसाठी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून शिक्षिका रोडे यांनी लोकवर्गणी काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपल्या आवडत्या शिक्षिकेला भेटवस्तू स्वरूपात दिली.

शिक्षिका शीला रोडे ह्या २०१८ पासून मालेवाडा येथे शिक्षिका म्हणून आल्या होत्या. त्यांनी मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत सात वर्षे नोकरी केली. शिक्षिका शीला रोडे यांना अनेक शिक्षकांचे यावेळी मार्गदर्शन सुद्धा लाभले. विद्यार्थीनी आपल्या लाडक्या श्रद्धावान शिक्षकेला “तुम्ही कधी येणार परत”? अशी भावनिक साद घातली.

शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने नवीन आलेल्या शिक्षिका माधुरी ईमाने यांचे स्वागत केले. शिक्षिका रोडे ह्या तास येथे शिक्षिका असतांना त्यांच्या जागी ईमाने ह्याची बदली तास येथे झाली होती. तर शिक्षिका रोडे यांचे भिवापूर तालुक्यातील दुसऱ्या ठिकाणी बदलीच्या रुपात स्थलांतर झाले होते. तोच ‘खो – खो’ पुन्हा ह्या दोन शिक्षिकेमध्ये झळकला. गावकरी व विद्यार्थी यांनी भावूक होऊन आपल्या आवडत्या शिक्षिकेला निरोप दिला. निरोपाच्या क्षणी सर्वांचे हृदय गहिवरून आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे