Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनसांगलीसाहित्यगंध

मायेची छाया

वृंदा(चित्रा) करमरकर जिल्हा सांगली

0 6 6 7 3 7

मायेची छाया

मायेची छाया लाभता, दु:ख दूर पळते
प्रेमस्पर्शाने मन आनंदाने फुलून जाते
ऊन कितीही असले तरी सावली मिळे
आईच्या कुशीत सुखाची ऊब मिळते

धकलेल्या जीवाला मिळे आधार मायेचा
अश्रू पुसणारा लाभतसे पदर प्रेमाचा
शब्दांविना होतसे तिच्या मनाशी संवाद
मायेच्या छायेत वास असे हो देवतांचा

नाही अपेक्षा कसली नसे मोह कशाचा
मायेच्या ओलाव्याने विरघळे दाह मनाचा
मामेच्या छायेत मिळे आकार जीवनाला
स्वत:चा ना विचार लेकरांच्या कल्याणाचा

वादळ आले तरी आई ढाल होऊन उभी
दु:खाच्या अंधारात आशेची ज्योत तेवती
मायेची छाया देतसे उमेद सदा जगण्याची
पडताना सावरते, चालण्यास देतसे शक्ती

वटवृक्षापरी असे, देते सावली प्रेमाची
तिच्यामुळे फुलतसे बाग गंधित जीवनाची
जरी नसली ती आज हरवते रुपाची काया
पण मनी सदा भरून राहे माया ही आभाळाची

वृंदा(चित्रा) करमरकर
जिल्हा सांगली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 6 7 3 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे