0
4
8
2
9
7
शब्दांच्या गावात
शब्दांच्या गावात माझी
जेव्हा सहज सफर होते
लेखणीला माझ्या अनामिक
स्फुरण नवे काहीसे चढते
सरसावते लेखणी हाती
नव विचारांची घेऊन ढाल
कागदावर अवतरतो क्षणात
काव्यपंक्तींचा सुंदर महाल
अलिंगन प्रेमे देतो शब्दांना
कवटाळून छातीचा पिंजरा
उलगडलेल्या शब्दांना मी
करतो मग मानाचा मुजरा
शब्दांच्या या गावात अलगद
मी शोधतो नवे नवे काही
शब्द घालतात साद अन्
लेखणी होते शब्द प्रवाही
शब्दांच्या गावात वाटते
मनमुराद नित्य विहरावे
सुंदर जीवन गाणे माझे
बेधुंद सुरांनी गात रहावे
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर जि.पुणे
========
0
4
8
2
9
7



