आदर्श व्यक्तिमत्त्वाचे धनी, तुळशीराम गुरुजी..!!!
शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर
आदर्श व्यक्तिमत्त्वाचे धनी, तुळशीराम गुरुजी..!!!
“मव्ह गाव हाय मुरंबी”,लव्हा तालुक्यातील.गाव तस लहान टुमदार. गावाभवती आमराईच्या बागा आणि केळीच्या बागा. पैलवान , मल्लखांब , कुस्तीच्या आखाड्याने परिचीत असलेला गाव. गावात मारोती व विठ्ठल रुक्मीणीचं भव्य मंदिर. पहाटे काकडा आरती ,भजन व कीर्तन असा सांप्रदायी गाव. गावात चौथी पर्यंत जिल्हा परीषद शाळा, कडक स्थितीचे गुरुजी असायचे. त्यांचा दरारा भितीदायक व अभ्यासू वृतीचा होता.चौथीपास झाल्यावर बाजूच्या जि.प.शाळा रिसनगावांला जावे लागत असे. मुरंबी ते रिसनगांव दोन किलोमीटर रस्ता. तसा रस्ता पाऊलवाट अर्ध्यावर सडक मध्येच नदी .पाऊस पडल्याने नदीला पूर यायचा. पूर आल्याने शाळेला जाता येत नसे. मी त्यावेळी लहान होतो.मला चांगलं कळतं होतं. तिसरी किंवा चौथीला असेल.
माझ्या गावातील मोठ्या मुली व मुले रिसनगावांला शाळेला जातं असतं. मग मलाही वाटायचं मी पण यांच्या सारखंच शाळेला जाईल. गावातील चुणूकदार विद्यार्थी म्हणजे तुळशीराम आचणे होय. त्यांच्यासोबत माझे बंधुही होते. तुळशीराम गुरुजीची लहान पणची परिस्थिती अंत्यत हालाखीची घरात अठरा विश्व दारिद्रय . आईला बोलता येत नव्हतं .आईने खूप खस्ता खाल्या.लोकांच्या रोजणंदारीवर जावे लागत होत.तिचा एकुलता एक मुलगा तुळशिराम. रविवारी व शाळेला सुट्या लागल्यावर आईला मदत करत असे. लहानाचा मोठा होत होता.शाळेतील फी देण्याइतपत तुळशीराम कृडे पैसे नसायचे. सातवी पास झाल्यावर 8 वी ला लोहा तालुक्याच्या ठिकाणी बोर्डींग मध्ये दाखल झाला.अभ्यासात मात्र अति हुशार राहिला. पुढे त्यांचा चुलत भाऊ केशव ने ही पैशाची मदत केली.दहावीला चांगले मार्क मिळाले. डी.एड. ला नंबर लागला. डी.एड.ही चांगल्या गुणांनी पास झाला.डी.एड. चे फार्म भरणे सुरु झाले होते.कालांतराने जि.पं शाळेत पोस्टींग ही झाली.
खडतर प्रवास करुन आज ख-या अर्थाने जीवनाला कलाटणी मिळाली.आज त्यांचा शब्द आभाळ झालाय अस मला वाटत.त्यांची इतरांच्या मदतीला धावून जाण्याची प्रवृती कायम आहे.मदतीला बार हमेशा पडतात.ब-याच जणांची नोकरीचेही कामे केली आहेत.शाळेतही मुलांना जीव लावून शिकवतात.त्यांना जादा वेतनवाढही मिळालेली आहे. सध्या जि.पं शिक्षक पत संस्थेतूनही निवडून आले आहेत त्यांना जि.प.आदर्शपुरस्कार,आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार व शाळेला गुणवतेत संपूर्ण राज्यातून महाराष्ट्रात राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त ,सामाजिक कार्यातही महाराष्ट्र राज्यस्तरीय संघटनेत विविध पदावर कार्यरत .त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.ते आमच्यासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व नक्कीच आहेत.एवढे मात्र खरे …
शिवाजी नामपल्ले
अहमदपूर जि.लातूर



