
0
4
0
9
0
3
पाठांतर
अ,आ,इ पाठांतर
क,का,की पाठांतर
वर्णाक्षरे पाठांतर
बाराखडी पाठांतर
आई म्हणे वाचन कर
मराठीच्या गोष्टी पाठांतर
ताई सांगे बे चे पाढे
कर म्हणे पाठांतर
गुरुजीचा धाक लयी भारी
गायला सांगत कवितेच्या ओळी
हातात त्यांच्या रुळ पाहून
सांगतसे मी कविता गाऊन
शाळेत असे पाठांतरावर जोर
खाता घेता बडबड फार
उतारा आठवण्यावर असे जोर
बडबड गीत आवडत फार
पाठांतर पाठांतर
नुसती घोकंपट्टी कर
थोरांचे चरीत्र पाठांतर
इसवीसन पाठांतर
अनिल मेश्राम
सौंदड गोंदिया
======
0
4
0
9
0
3





