0
4
8
3
0
0
“काल”
जुनाच जमाना यार बरा होता
प्रेमाचा ओलावा खरा होता
जुने तेच सोने आज कळे मज
आकाचाच सारा दरारा होता
स्वामीभक्त होती कालची माणसे
नयनी त्यांच्या तप्त निखारा होता
गद्दारी फितुरी कुणी केली जरी
सरदारांचा तो खडा पहारा होता
माते समान त्या साऱ्याच महिला
शिवरायासम तेज तारा होता
सारेच एकीने नांदती सुखात
जाती जाती मध्ये भाईचारा होता
अती स्वार्थाचीच रोगराई झाली
फिरणारा मतलई वारा होता
विषारी सापांचे फुत्कारे इशारे
खोट्याचाच फापट पसारा होता
दीपककुमार सरदार
किनगांवजट्टू जिल्हा बुलढाणा
0
4
8
3
0
0



