
0
5
1
6
4
1
तू चाल तुझीचं वाट
जीवनी,जीवनात रंगी,जीव माझा सावळा!
अंतरी, अंतरात रंगी, रंगणारा सोहळा!!
पाहता पाहता वाटांवरी वाटा!
अंतरात कुठेतरी रुततोय काटा!!
चालता चालता चालू लागले पाय!
मनी आक्रंदने, घेऊन नवी उमेद ठाय!!
दिसू लागली नव्या किरणांची पहाट!
किलबिलू लागली मनाची कवाडे आत!!
होऊन निर्भीड तू चाल गं ही वाट!
तुलाही मिळेल तू शोधणारी वाट!!
होऊन उर्जित, तुही हो प्रकाश!
दावण्या वाट, अंधाऱ्या आकाशात…!!
मनिषा कडू
हडपसर, पुणे.
=======
0
5
1
6
4
1



