‘अटलबिहारी वाजपेयी यांची कविता शाश्वत’; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
‘अटलबिहारी वाजपेयी यांची कविता शाश्वत’; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
पुणे : (30 ऑगस्ट) “अटल बिहारी वाजपेयी यांची कविता कुठल्याही काळाशी साधर्म्य साधू शकते.त्यांचे काव्य शाश्वत काव्य असून आजही त्यांच्या काव्याची प्रचिती येते..’कौन कौरव पांडव कौन’ सवाल करत वाजपेयी खंत,व्यक्त करतात ‘ हर पंचायत में पांचाली अपमानित है ‘. प्रतिभावंतांनी समाजाला समजून घेऊन राष्ट्रकल्याणाच्या अंतिम ध्येयासाठी सातत्याने योगदान द्यावे ” असे प्रतिपादन भाजप सांस्कृतिक विभाग, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर अध्यक्ष आणि पहिल्या विश्वकाव्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
सांस्कृतिक विभागातर्फे ज्येष्ठ कवयित्री अपर्णा आंबेडकर यांना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी काव्य स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला,याप्रसंगी डाॅ.घाणेकर बोलत होते.अध्यक्ष.स्थानी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर अध्यक्ष पोपटराव गायकवाड होते.प्रारभी शलाका गाडगीळ यांनी स्वागत गीत सादर केले.
सांस्कृतिक विभागाच्या उपाध्यक्ष सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष प्रिया दामले यांनी प्रास्ताविक केले.महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष भारती महाडिक, उपाध्यक्ष शैलजा सोमण यांनी अतिथी स्वागत केले.याप्रसंगी सरचिटणीस मदन डांगी यांनीही मनोगत व्यक्त केले.कवयित्रीआंबेडकर यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन सामाजिक आशयाच्या काही कविता सादर केल्या.डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनियतकालिकाच्या 560वा अंकही या सोहळ्यानिमित्त प्रकाशित करण्यात आला.
भाजपचे तुळशीराम उणेचा, रविन्द्र भगवान, श्रीकांत कुलकर्णी, मोहन खटावकर तसेच साहित्य क्षेत्रातील मंदा नाईक, रविन्द्र गाडगीळ शिवाजी उराडे, बाबा ठाकूर, विजय सातपुते, किरण जोशी आणि नवचैतन्य हास्यक्लबच्या नेहा आरवडे आदि मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक आघाडीचे कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग यांनी आभार मानले.





