स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या ६२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या ६२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये कार्यक्रमाचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये थोर आश्रय दाते स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या ६२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले व दिपप्रज्वलन केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक, सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे सचिव प्रभाकर म्हात्रे यांनी केले. मुख्याध्यापक – प्राचार्य अनिल दारकुंडे सर व सहाय्यक शिक्षक आशिष राणे सर यांनी आपल्या मनोगतातून स्व. बाबासाहेब नाजरे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे खजिनदार सुवर्ण कांबळी, सचिव प्रभाकर म्हात्रे, कार्यकारीणी सभासद सुहास म्हात्रे, कार्यकारीणी सभासद दिपक राऊळ, कार्यकारीणी सभासद अनिल राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





