Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

तुझं गुलाबी हसणं

विष्णू संकपाळ

0 4 8 2 9 7

तुझं गुलाबी हसणं

तुझं गुलाबी हसणं
पूनव रात भासणं
जणू सभोवताली
चांदण सडा शिंपणं… //

दास जाहलो तुझा
हे रूप तुझं पाहून
वाटे चकोर होऊन
हास्य घ्यावं पिऊन… //

जसं कळी उमलणं
तसं ओठांचं खुलणं
देठाच्या मानेवरती
ते डौलदार झुलणं… //

मधूर स्मित गंधावर
मन भ्रमराचं भुलणं
प्रित गित गुणगुण
बेहोश रूंजी घालणं.. //

वार्‍यावरती स्वार तू
दाही दिशास दरवळ
श्वासात भरून घेताच
दूर होई सारी मरगळ… //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे