0
4
8
2
9
0
पत्रपेटी
पत्र म्हणजे जिव्हाळा सुंदर
दिसे पत्रातून चेहरा समोर!
अर्धी भेट व्हायची जरूर
शब्दाला फुटायचे अंकूर!
नाती गेली बघ कोसो दूर
नाही राहिला रे अधिकार!
आली आठवण रे वारंवार
दिसे चेहरा याच फोनवर!
कोण लिहितो पत्र बरोबर
विसरले सारे खरे संस्कार!
मुले हुंदडायची रे गावभर
येता पोस्टमन हा वेशीवर!
काकू पत्र आलंय पहा बरं
कुणाचं हाय सांगा खरं !
काका निघाले का शेतावर
पाय पोळतात जा सरसर!
बंद पत्राची पेटी ही देशभर
नाही कधीच पुन्हा दिसणार!
बदलले पोष्टाचे रूप फार
पत्र,पाकीट,अंतरदेशी तर!
नाही वाचायला रे हातावर
जून गेलं नवीन आलं सारं!
हसायचं अन रडायचं बरं
पत्र वाचताना खरोखर!
कधी शुभ मिळे समाचार
कापायचे हात रे थरथर!
पत्राचीपेटी दिसे लालसर
उघडायची रे एकच बारं!
अशोक महादेव मोहिते
बार्शी,जिल्हा सोलापूर
0
4
8
2
9
0



