0
4
8
2
9
0
चिमणे
अगं अगं चिमणे
झाडावर बसून काय करते
सुंदर अंगणी ये माझ्या
तांदूळ कणी तुला देते
अगं अगं चिमणे
नदीवर जाऊन काय करते
झाडाजवळ ये आमच्या
पाणीभांडे तुजसाठी बांधते
अगं अगं चिमणे
तुझी पिल्ले कुठे गेली
खाऊ आणला त्यांच्यासाठी
त्यांची खूप वाट पाहिली
अगं अगं चिमणे
रानी आपण लावू झाडे
जोपासना करू त्यांची
हिरवळ दाटे चोहीकडे
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
=========
0
4
8
2
9
0



