
0
5
1
7
9
5
आई, मला हे जग पाहू दे
आई मला जन्म तू देना
मला हे जग पाहू देना ॥धृ॥
का गं आई माझा एवढा राग
तू सुद्धा स्त्री आहे ना गं ॥१॥
हवा तुला वंशाचा दिवा
मी काय गुन्हा एवढा केला ॥२॥
मारून टाकशील तू स्त्री-भ्रूण
मुलासाठी कोठून आणशील सून ।।३॥
लक्ष्मी – सावित्री इथे आहे पूज्य
मी का ग आहे तुला त्याज्य ॥४॥
करीन मी आई-बाबांची सेवा
राखीन मी संस्कृतीचा ठेवा ॥५॥
मी मागणार नाही तुला काही
मला हे जग पाहू दे गं आई ॥६॥
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता.उमरेड जि. नागपूर
========
0
5
1
7
9
5



