
0
5
3
6
2
5
बुवाबाजी
सर्वात हुशार विद्यार्थी
वैद्य नि अभियंता सारे
कक्ष -१ नि कक्ष-२ ला
प्रथम श्रेणी पास होणारे…!!
द्वितीय श्रेणीचे वाणीने
राजकारण करून पुढारी
सर्व ढ समजले जाणारा
विद्यार्थी बुवाबाजी भारी…!!
विशेष गोष्ट म्हणजे हुशार
पासून पुढाऱ्यापर्यंत सारे
बुवाबाजीच्या नादात मग
मेंदू गहाण टाकती बिचारे..!!
बुवा मग हातचलाखीने
धारण करी देव अवतार
ताईत माळा अंगारा धूप
सर्रास विक्रीचा बाजार…!!
श्रद्धा हवी नको अंधश्रद्धा
करूया बुवाबाजी हद्दपार
डोळसपणे विवेकाने आता
वैज्ञानिक दृष्टीचा अंगीकार..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
0
5
3
6
2
5



