Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

शुध्द कर्म

गोवर्धन तेलंग पांढरकवडा.जि, यवतमाळ

0 6 2 9 0 4

शुध्द कर्म

मला नसे जात नाहीच रे धर्म !
जीवनी ठेवतो सदा शुद्ध कर्म !!
पेपर फुटी असेना ती ढगफुटी!
निवांत निशांत ,माझी पर्णकुटी!!

सांगतो सर्वांना असा मर्म जगा !
रुसवा फूगवा कशालाच उगा !!
जीवाचे भावाचे मिळतील तुला !
शोध घेतला की सुखानेच झुला!!

धना संपत्तीला मानू नको आता !
जन्मल्यावर तू विसरु नको माता!!
स्वतःला माणसा ओळखत नाही!
नुसती मारतो तू ,फुकाची बढाई !!

क्षणभंगुर हा चाले जगी खेळ !
होत्याचे नव्हते करते ही वेळ!!
तुका नामा चोखा वाच रेअभंग!
जनसेवा भक्तीने ,पावे पांडुरंग!!

चूकला ना म्रुत्यु येथे कुणालाही !
साक्षी तोच आहे जीवा- प्राणाही !!
साता रंगी सारे ओलेचिंब होऊ !
फक्त भगवा नको हिरव्यात न्हाऊ !!

गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि, यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे