Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

करूया बाप्पाचे स्वागत

कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर

0 4 8 2 9 3

करूया बाप्पाचे स्वागत

भजन कीर्तन ढोल ताशा
वाजत गाजत आले बाप्पा
मखरात चला बसू त्यांना
शोभिवंत करूया त्यांचा कप्पा

रांगोळी काढुनी अंगणात
स्वागत करूया गजाननाच
खीर मोदक नेवैद्य देऊया
कंठ माळा घालूया मोत्याच

विद्येची देवता तू अधिपती
भक्तीचा जागर छान थाटला
शंकराचा पुत्र गजवदन आला
आनंद उत्सव झाला मनाला

करूया बाप्पाचे स्वागत
तोरण बांधू आंब्याच्या पानांची
रिद्धी सिद्धी आहेत स्वागता
आरती गाऊया गणरायाची

प्रथम पूजेचा मान सन्मान
सुंदर दिसे बाप्पाची आरास
माझा बाप्पा गोड दिसतो किती
आरती घेऊन उभे राहू स्वागतस

दुःख संकट पळती कष्टातून
घरी आले गणपती राया
तू सुखहर्ता तू दुःखहर्ता
पडते मी गजानन पाया

नेसवला पितांबरी भरजरी
नाना प्रकारचे अलंकार देहावरी
हाती मोदक गुळ खोबरे नैवेद्य
आशीर्वाद देतो बाप्पा खरोखरी

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे