कु. सायली ढेबे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार जाहीर
पुरस्कार वितरण सोहळा २५ मे रोजी निर्मिती लॉन्स, विजापूर रोड, जुळे सोलापूर
कु. सायली ढेबे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार जाहीर
पुरस्कार वितरण सोहळा २५ मे रोजी निर्मिती लॉन्स, विजापूर रोड, जुळे सोलापूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर: ए.डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ यंदा कु. सायली बाळू ढेबे यांना देण्यात आला. पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र, कलाक्षेत्र, साहित्यिका, लेखिका, उत्कृष्ट वक्त्या, स्व आत्मपरीक्षण व्याख्याने, अशा अष्टपैलूत पारंगत असलेल्या महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळ्याच्या त्या मानकरी ठरल्या. हा सोहळा २५मे रोजी निर्मिती लॉन्स, विजापूर रोड, जुळे सोलापूर येथे पार पडणार आहे.
श्री. अशोक गोरड (अध्यक्ष, ए.डी. फॉउंडेशन), श्री. महादेव महानूर (कार्याध्यक्ष)यांनी ३००व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पुरस्काराची घोषणा केली. मा.आ.श्री.प्रकाश शेंडगे (माजी आमदार ), मा.डॉ. नितीन वाघमोटे (आयकर आयुक्त, पुणे ), मा.डॉ. सचिन मोटे ( आयकर आयुक्त, मुंबई ) यांची उपस्थिती पुरस्कारास असणार आहे.
आयोजित कार्यक्रमास विशेष उपस्थिती मा.श्री. चिमण डांगे, श्री. चेतन नरोटे ( धनगर समाज नेते), सौ. रुख्मिणीताई गलांडे (सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे ), श्री. राम मांडूरके ( सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे ), मा.श्री.आ. उत्तमराव जानकर (माळशिरस विधानसभा ), मा.श्री.आ. बाबासाहेब देशमुख (सांगोता, विधानसभा), मा.श्री.आ. नारायण आबा पाटील (करमाळा विधानसभा ), डॉ.प्रा.श्री यशपाल भिंगे, मा.श्री अनिल जाहीर, प्रा. घनश्याम चौगुले, श्री. तुकाराम पाटील, सौ. श्वेता परदेसी, श्रीमती प्राजक्ता मालुंजकर असे मान्यवर उपस्थित असणार आहेत.