ऐकावे ते नवलच..!! एकाच घरात चौथ्यांदा चोरी… तरीही पोलिस निष्क्रिय?
CCTV फुटेज देऊनही चौकशी नाही; नागरिकांचा संताप उफाळला!

ऐकावे ते नवलच..!! एकाच घरात चौथ्यांदा चोरी… तरीही पोलिस निष्क्रिय?
CCTV फुटेज देऊनही चौकशी नाही; नागरिकांचा संताप उफाळला!
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि २९) शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत एकाच तक्रारदाराच्या घरी तब्बल चौथ्यांदा चोरीचा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तक्रारदाराने CCTV फुटेज पोलिसांना सादर करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा साधी चौकशीसुद्धा करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपास करण्याची तसदीही घेतलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणात तत्काळ कारवाई करून दोषींना अटक करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.



