Breaking
ई-पेपरकविताकृषीवार्ता

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 8 6

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : कट्टीचा महिना 📘*
*🔸मंगळवार : ११ /जून /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*कट्टीचा महिना*

सुट्टीतील धमाल सांगूया
तुझ्यापेक्षा,मीच सरस,
चारचौघात खुबीने मांडूया
जगण्यातली, वाढवू चुरस.

पाऊससरी अंगावर झेलू,
चिखलाचे शिंतोडे, उडवू
आलाय हा,कट्टीचा महिना
रुसवे फुगवे,करून पाहू.

घरासमोर आली, नदी
कागदी नाव,करून सोडू,
गंमतजमंत करू पाहून
मामामामीला,संदेश धाडू.

काडीच्या टोकाने, टोलवू
शर्यत लावू पुढे जाण्याची,
बुडवा बुडवीच्या खेळाने
कट्टी झाली,बाल मित्राची.

वाढता,पावसाचा जोर
चला,हाती हाथ धरूया,
गळ्यात गळे मिळून घालू
सारे,घराकडे पळत जाऊया.

*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*मानवत परभणी*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥📗💥➿➿➿➿
*कट्टीचा महिना*

संपलाय आता
कट्टीचा महिना
बाई म्हणतील
शाळेलाच याना…१

कट्टीच्या वेळेत
होती फार मजा
वर्गात होईल
बघ आता सजा…२

गेम खेळायची
हौसच निराळी
रोज मारतील
गुरुजी आरोळी…३

रानात जायची
गंमतच भारी
आंबे तोडण्यास
मिळे ती उभारी…५

जांभळी टपोरी
करवंदे काळी
रानात दिसते
दाटसर जाळी…६

सोबती जातील
परत गावाला
नाही राहणार
मित्र खेळायला…७

*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा- नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥📗💥➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना त्वरीतच पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कट्टीचा महिना*

हुश्श….!
परीक्षा आली आटोपत
लागणार आता सुट्टी
मामाच्या गावाच्या स्वप्नात
रंगलो मी आणि बीट्टी

बीट्टीने ठरविले, एकदाचे
संध्याकाळी भेटायचे ,
मनसोक्त खेळायचे ,
खूप खूप बोलायचे

पण…
दुपारच्या झोपेचे
गणित माझे बिघडले,
खेळायला जाण्याचे
बेत गडबडले !

बीट्टी ,थकली पाहून वाट
करायला लागली थयथयाट

मग…
मैदानाची वाट धरली
बिट्टी आहे थोडी भोळी
खिशात सोबत घेतली
चॉकलेट ची गोळी!

बापरे…
बीट्टी होती तोऱ्यात
नजर माझी,
पालापाचोळ्यात
चिडका स्वर.. वरची पट्टी
शेवटी बिट्टीने, घेतली कट्टी

कान धरले..
मागितली माफी,
पाया पडलो..
उपाय नव्हता काफी

बीट्टी आमची, हट्टी फार
ऐकायला मुळीच नाही तयार
“कट्टी…. कट्टी… कट्टी…
एक वर्ष नाही बोलणार!”

विचारात पडलो ..मला आले रडू
आता उन्हाळा कसा काढू

बिट्टीला बोललो…”ऐक माझे
यापुढे लक्षात ठेवेन, शब्द तुझे
एक वर्ष फार होईल ,
तुझ्या वाचून तर,
माझा जीवच जाईल!”

मारल्या बैठका,
पकडून कान..
चॉकलेटचा
दिला मान..
“आता खेळायला
नसणार बुट्टी!”
तेव्हा कुठे,
नरमली बीट्टी?

म्हणाली…
“पुढे असे मुळीच चालणार नाही
कट्टीची रीतभात असते काही
बरं…
कट्टी वर्षाची रद्द
ठरवू एका महिन्याची हद्द!”

हुश्श…!

कट्टीचा हा महिना
कटता काही कटे ना..
उन्हाळ्याची सुट्टी
संपता काही संपे ना..

पावसाच्या धारांत
जाऊ, नव्या वर्गात
भेटू मी आणि बीट्टी
संपली असेल कट्टी
जाऊ शाळेत सोबतीने
वाजवीत शिट्टी!

*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥📗💥➿➿➿➿
*कट्टीचा महिना*

संपली आता परीक्षा
चला खेळ खेळूया…
सुट्टीच्या या वेळेला
गावा… मस्तीच्या जाऊया। ।

आला आला गाडा
नाव काय फोडा….
म्हणत आपण आपापल्या
मैत्रिणी निवडूया ।।

गटागटाचे खेळ
हसत खेळत खेळूया
माझी मैत्रिण हवी मला
जोर त्यावर देवूया ।।

नाही मिळाली मैत्रिण
म्हणून रूसू बाई रूसूया….
कट्टी मट्टी बारबट्टी…..
करून कोपर्‍यात बसूया….।।

मजेदार आवाजाने
तिला सारे हसवूया
माकडं होवून दातही
तिच्यापुढे विचकवू ।।

क्षणात कट्टी तोडून मग
मैत्री पुन्हा करूया…
सुट्टी कट्टीचा महिना हा
आनंद क्षणात पोहूया….. ।।

*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥📗💥➿➿➿➿
*कट्टीचा महिना*

संपतील आता सुट्या
सुरू होतील शाळा
मित्र,मैत्रिणी सारे
होतील शाळेत गोळा

नविन वर्ग,नविन शिक्षक
नवे नवे मिळतिल मित्र
भेटीगाठी वाढुनिया
गलका होई एकत्र

कुणी प्रेमळ,कुणी रागीट
कुणी असे अलवार
होता थोडी तिरगी मिरगी
कट्टी,बोली वारंवार

असा हा कट्टीचा महिना
येऊ लागला जवळ जवळ
मनात मात्र प्रत्येकाच्या
आपुलकीची तळमळ

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥📗💥➿➿➿➿
*कट्टीचा महिना*

संपली परिक्षा
उतरला भार
लागला निकाल
झालो आरपार

आता लागली सुट्टी
शाळेशी झाली कट्टी
कट्टीचा महिना सुरू
अभ्यास कशाला करू

सुरू झाला आता
कट्टीचा महिना
सर्व मित्र मैत्रिणी
हे माहीत सर्वांना

पण कट्टीचा महिना
आता आला संपत
सर्वांनी घेतली मजा
सर्वांना आली रंगत

सुट्टीच्या महिन्यात
सर्वांनी केली गंमत
मामामामीच्या गावी
मेजवानीची केली पंगत

आता लागली लय
नवीन वर्गात जाण्याची
सर्व पाहतात वाट
शाळेची घंटा वाजण्याची

सुट्टीच्या दिवसात मस्त
मुलांनी केली मजा
तरणपुरण खाऊन
मस्त केला गाजावाजा

आता होणार सर्वांशी मैत्री
अशी आहे खात्री
भेट एकमेकांशी
मन मिळणार सर्वांशी

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💥📗💥➿➿➿➿
*कट्टीचा महिना*

शाळेला आहे सुट्टी
मित्रांशी झाली कट्टी
वर्ग भरले नाही
मित्र भेटले नाही

मामाच्या गावी जाणार
शेवया रस खाणार
पाळाचे आंबे तोडणार
तोंड भरस्तोवर खाणार

उन्हाळा भारी गरम
भाकर मिळेना नरम
चटणीचा ठेचा मस्त
गावात मिरची स्वस्त

लग्नात फिरतो ताई सोबत
तपणीचा घेतो शरबत
डिजे च्या तालावर नाचन
विसरुन गेलो पुस्तक वाचन

सुट्टीच्या काळात बाईशी कट्टी
शाळा नी मित्रांशी झाली कट्टी
आठवण येते शाळेची
भेट व्हावी सगळ्यांची

लवकरच संपणार कट्टीचा महिना
शाळा सुरू झाली की मित्र भेटेना
परत सुरू होईल मौज मस्ती
करणार मी माझ्या शाळेशी दोस्ती

*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥📗💥➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे