
0
4
8
2
8
4
संवेदना
क्षणभर झाली बोथट
वेदना नि संवेदना
काळाने फेकले थोटक
अन् सैरभैर केले मना.. .
स्तब्ध झाली धरणी अन्
निरव झाली शांतता
बेधुंद झाला दिवस अन्
स्वरात आली आर्तता…
आहे आणि नाही यातील
अंतर पुसले क्षणात…
झंकारली कळ मग
सर्वांच्याच मनामनात…
शारदा जोशी कुलकर्णी
जिल्हा बीड
0
4
8
2
8
4



