0
4
8
2
9
0
सुगंधी अत्तर
काय सांगू राजेहो
माझी करुण कहाणी
डोक्याच्या नसा फाटल्या
विचार करुनी
अंगावर दुखणे
किती दिवस काढायचे
चला आतातरी
डॉक्टरांना भेटायचे
तपासून म्हणे
किती उशीर केला
किती दिवस रोग
जपून जपून ठेवला
एम आर आय करायला
मशिनमध्ये डोंबले
मला तर सगळे
देवच आठवले
सुगंधी अत्तर ची
आठवण झाली
अन सजलेला देह आठवूनी
उमसून रडली
घाबरायला असं झालं
कधी बाहेर काढते वाटे
या नाजूक देहावर
अचानक उभारले काटे
आठवली मला
माझीच अंतिम यात्रा
अन आठवले त्या क्षणी
नातलगाची जत्रा
ज्योती कार्लेवार चंद्रपूर
0
4
8
2
9
0



