0
4
8
3
0
0
ही वाट दूर जाते
क्षितीजासम मज भासते
आयुष्याला आकार देते
कधी वाटे सुलभ सुकर
पुन्हा ही वाट दूर जाते
यत्न तोचि धर्म जाणोनी
आपलीशी जवळीक वाटते
बाका प्रसंगी ही मार्ग दाविते
पुन्हा ही वाट दूर जाते
दाखविते सत्याचा मार्ग सदैव
चुका पासून सावध ती करते
प्रत्येक क्षणाला हवीशी वाटे
पण ही वाट दूर जाते
जगी साध्य सर्व असे सायास
पण पुरती फसगत होते
यशाचा किनारा गाठण्यापूर्वी
पुन्हा ही वाट दूर जाते
जीवन ही संघर्षाची बोट
भवतीर कशी ही गाठते
प्रवाहाच्या दिशेनेच जाताना
मध्येच ही वाट दूर जाते
दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
उमरगा जि.धाराशिव
==========
0
4
8
3
0
0



