Breaking
ई-पेपरकवितापरभणीमराठवाडासाहित्यगंध

उतरंड

मनोज परसराम शिंदे ता पालम,जिल्हा परभणी

0 5 9 0 3 4

उतरंड

घराघरांची उतरंड अजूनही तशीच उभी,
वरच्या पायरीवर सत्ता, खालची पायरी भुकेली.
कष्टांच्या घामाला इथे किंमत कधीच नसते,
नावापुढल्या आडनावाचीच नशिबावर सही असते.

बाप राबतो आयुष्यभर, मुलगा पुन्हा राबत राहतो,
गरिबीचा वारसा पिढ्यान् पिढ्या खांद्यावर वाहतो.
शिक्षणाच्या दाराशी स्वप्नं रोजच हरवून जातात,
भाकरीच्या शोधात अनेक भविष्यं अर्धीच राहतात.

वर बसलेले मोजत राहतात संपत्तीचे आकडे,
खाली उभ्यांना मिळतात फक्त आश्वासनांचे धागे.
न्यायाच्या तराजूला पैशांचेच वजन लाभते,
सत्य रोज रडत असते, खोटं मात्र हसत जगते.

माणसामाणसांत उभ्या केल्या जाती, पदांच्या भिंती,
प्रेमापेक्षा मोठ्या ठरल्या अहंकाराच्या रीती.
समानतेची भाषा फक्त भाषणांत ऐकू येते,
प्रत्यक्षात मात्र माणुसकीच पायऱ्याखाली चिरडली जाते.

उतरंड मोडायची असेल तर मनं आधी जोडावी,
माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी द्यावी.
जन्माने नाही, कर्माने उंची ठरते हे मानू या,
नवी पिढी घडवताना माणुसकीची उतरंड रुजवू या.

मनोज परसराम शिंदे
ता पालम,जिल्हा परभणी
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 3 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे