
0
5
9
0
3
4
अंतिम टप्पा
जीवनाचा प्रवास अविरत
चालू असतो सदा
अंतिम टप्पा गाठण्या
प्रयत्नांची असे अदा
सुगंधाचा बहर असे
दु:खाचाही कहर
सुख दुःखाने जीवन भरले
आनंदाची लहर
शीतल छाया कधी मिळते
ऊन्हाच्या तप्त झळा
संघर्षाने जीवन फुलते
ह्रदयी खुलते लळा
अंतिम टप्पा कधी न यावा
वाटते सदा मनी
प्रवास अपुला चालू राहवा
जीवनाचा मी ऋणी
अंतिम टप्पा सुखद व्हावा
करू ईश्वरास प्रार्थना
नको आम्हाला आता काही
हीच शुध्द भावना
पुरुषोत्तम वि.ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
============
0
5
9
0
3
4



