तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे सुयश
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे सुयश
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: गुरूवार दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी पी. एन. पी. शाळा वेश्वी येथे तालुकास्तरीय शालेय मुलींची कबड्डी स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत १७ वर्षा खालील मुलींच्या गटात आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासच्या मुलींच्या संघाने नेत्रदिपक खेळ करून प्रथम क्रमांक पटकाविला.
*१७ वर्षा खालील मुलींचा कबड्डी संघ खालील प्रमाणे-*
१) श्रेया विलास म्हात्रे इ.१० वी [ कर्णधार ]
२) श्रुती शिवाजी कोळी इ.१० वी
३) ध्रुवी राजेंद्र म्हात्रे इ.११ वी
४) लक्ष्मी ओमप्रकाश थापा इ.९ वी
५) मनिषा ओमकार थापा इ.८ वी
६) वंशिका विरेंद्र शितप इ.९ वी
७) तपस्या रविंद्र वाघ इ. १०वी
८) शौर्या राकेश शिंदे इ.१० वी
९) समिक्षा गजानन पाटील इ.८ वी
१०) किर्ती संजय राऊळ इ. १० वी
११) प्रिया सचिन शहा इ.११ वी
सदर संघ जिल्हास्तरीय शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत अलिबाग तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल. ह्या सर्व विद्यार्थीनींना स्पर्धेसाठी गणेश राणे सर, विशाल पाटील सर, प्रियंका राणे मॕडम यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवासच्या सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ. सा. धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





