Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

‘आभारीय संजयवाणी’; डॉ संजय पाचभाई

0 4 8 2 8 4

आभारीय संजयवाणी’; डॉ संजय पाचभाई

प्रेमाचं ऑडीट’ माझ्या या रचनेला सर्वोत्कृष्ट तेरामध्ये जागा मिळाल्याबद्दल आदरणीय राहुल सर, परीक्षक मंडळ आणि समूहातील माझे स्नेही यांचे मनःपूर्वक आभार.

पिरमाचं ऑडीट बी व्हते हे मले मालूम असतं तं मी ते पिरेम पत्र आतावरी राखून ठेवले असते, बयीन आता मालूम पडलं, जावू द्या. तसंबी मले पिरेम पत्र लिवाची गरजच नायी पडली, रोज कॉलेज मंदी भेटी व्हाच्या फक्त भेटी हं. त्याचं असं हाहे ती एका सालानं मायी जूनियर.

माह्या वर्गात 20 पोट्टे आणं 30 मुली बयीण पक्की हिरवळच जी. पण त्याचं का हाहे आमची बारा पोट्ट्याची गँग, सप्पा गाॅन केस,बारा जिल्याचे बारा पोट्टे त्याच्यानं वर्गातल्या पोट्ट्या टरकूनस राये. मूण एक बी पोट्टी पटली नायी नायीतं असं मणा त्यायनंच मले भाव देल्ला नायी. मंग नवीन अ‍ॅडमिशन झाले अन् मले ते दूरूनच येतानी दिसली आणं माहा दिल गार्डन गार्डन झाला.

‘की’ती नाजूक तुझे ओठ
‘शो’धूनही नाही भेटणार लाखात
‘री’झवावी वाटते लेखणी तुझ्या सौंदर्यापुढे असंच लिवूनच टाकलं जी..

तसा मी पैशानं भिकारचोट , सिकत वरी पायात स्लीपर, बापानं देल्लेली सायकल घेवून जावो, माहे मित्र बी पक्के बैताड लेकाचे माहीस सायकल घेवून सन्या फिरे मंग मी बी कालेजाच्या व्हरांड्यात चक्कर मारून येवो आनं प्राचार्यच्या कॅबीन पुडं लावून देवो कोणीस कायी मणाची हिम्मत नायी करे तसा वटंच व्हता आमचा. एवढं असून सण्या बी ते माया पिरमात कसी पडली देव जाणे.
तिले डब्बलसिट चाल मणो तं आपण पायदळस जावू मने, तिले बी लाज वाटत असण..

आताच्या मायबापावाणी माहे लाड नवते पूरवले, पोट्यानं कोठं नाव टाकलं कोठं आपल्या नावाचे दिवे लावले कायीच पत्ता नवता. पण राजी खूशीनं लग्नाले परमीसन मात्र देल्ल.
आता हे सप्पायचं ऑडिट करतो तवा आमालेच खूब हासाले येते . ते दिस आठवते पायरीवर तासनतास गोष्टी.आणं हो तवा दूरदर्शन वर दर शनिवारी आणं ईतवारी सिनेमा लागे, त्यामंदलं एकांदी गाणं सोमवारी मी तिच्या वर्गा म्होरं मणत जावो मंग हरूस कण ते बायेर पाये आणं गालातल्या गालात गोड हासे.
झुके जो तेरे नयना हे गाणं तं पक्क गाजलं व्हतं माहं.

मृद्गंध, डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.
©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे