Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकृषीवार्ताकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

बँक ऑफ बडोदातर्फे अलिबाग येथे किसान पखवाडा २०२५ चे यशस्वी आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 6

बँक ऑफ बडोदातर्फे अलिबाग येथे किसान पखवाडा २०२५ चे यशस्वी आयोजन

रायगड जिल्ह्यातील ७०० हून अधिक शेतकरी सहभागी

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

अलिबाग : बँक ऑफ बडोदातर्फे अलिबाग येथे किसान पखवाडा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तसेच रायगड जिल्ह्यातील विविध शाखांचे शाखा प्रमुखही या कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री किशन नारायणराव जावळे, आयएएस, जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मा. श्री लाल सिंग, कार्यकारी संचालक, बँक ऑफ बडोदा; मा. श्री राजेश मल्होत्रा, मुख्य महाव्यवस्थापक ग्रामीण व कृषी बँकिंग, आरआरबी व आरसेटी; तसेच मा. श्री सुनील कुमार शर्मा, महाव्यवस्थापक व विभागप्रमुख, मुंबई विभाग यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमास मा. श्री जी. एस. हराळ्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी); सौ. प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक, एमएसआरएलएम, रायगड; तसेच श्री पांडुरंग ए. बामणे, सहाय्यक व्यवस्थापक, एपीईडीए यांनीही उपस्थिती दर्शविली.

या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील ७०० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी मा. कार्यकारी संचालकांनी किसान पखवाडा उपक्रमाचे महत्त्व विशद केले तसेच महिला स्वयं-सहायता गटांनी दर्शविलेल्या उत्स्फूर्त सहभागाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमादरम्यान स्वयं-सहायता गट, फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो, बीकेसीसी तसेच ट्रॅक्टर कर्ज या विविध कर्ज योजनांअंतर्गत मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच डिजिटल व्यवहारांमधील सुरक्षितता व सायबर फसवणूक प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी नुक्कड नाटक सादर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री मनीष कुमार सिन्हा, प्रादेशिक प्रमुख, नवी मुंबई विभाग यांनी उपस्थितांचे आभार मानले व शेतकऱ्यांना त्यांच्या बँकिंग गरजांसाठी बँक ऑफ बडोदाच्या शाखांना भेट देण्याचे आवाहन केले. तसेच सर्व ग्राहकांना तत्पर व कार्यक्षम सेवा देण्याचे आश्वासन दिले.

किसान पखवाडा २०२५ उपक्रमामुळे बँक ऑफ बडोदा शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकेल व सर्वसमावेशक व दर्जेदार बँकिंग सेवा देण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे