Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

जि. प. प्राथमिक शाळा सिर्सी येथे ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

अखिल रोडे प्रतिनीधी

0 5 1 6 5 2

जि. प. प्राथमिक शाळा सिर्सी येथे ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

अखिल रोडे प्रतिनीधी

बिनधास्त न्यूज मिडीया

उमरेड/​सिर्सी:(दि १०) स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिर्सी येथे ‘जागतिक महिला दिन’ (दि ०८) मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाद्वारे महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत समाजात त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. ​याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिर्सीच्या सरपंच सौ. वंदना बुटे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या कविता बारापात्रे, कामडी मॅडम, रेशमा जावेद तूर्रक आणि रेहाना शकील तूर्रक प्रामुख्याने उपस्थित होत्या.

उपस्थित मान्यवरांनी महिलांना आपल्या हक्क आणि कर्तव्याप्रति जागरूक राहण्याचे आवाहन केले. नियोजन आणि उपक्रम करतांना, कार्यक्रमाचे नेटके नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या शेगोकर, आत्राम मॅडम आणि अंगणवाडी सेविका वनमाला कामडी यांनी केले. याप्रसंगी बोलताना वक्त्यांनी सांगितले की, आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, तिचा सन्मान करणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे