Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

“शिवजयंती 2026” उत्सव १ मार्चला साजरा करणार

तिरळे कुणबी सेवा मंडळ नागपूर च्यावतीने आयोजन

0 5 1 7 9 7

“शिवजयंती 2026” उत्सव १ मार्चला साजरा करणार

तिरळे कुणबी सेवा मंडळ नागपूर च्यावतीने आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

नागपूर : (दि २६) तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे शिवजयंती उत्सव सत्कार सोहळा रविवार दिनांक १ मार्च रोजी, सकाळी १० वाजता. तिरळे कुणबी सेवा मंडळ, टाऊन हॉल आशीर्वाद नगर नागपूर येथे आयोजित केला आहे.

या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. अमरावतीचे श्री. नरेशचंद्रजी काठोळे यांचे मिशन आय ए एस, वरील प्रबोधन व मार्गदर्शन तसेच सोबतच शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन: “आजच्या परिस्थितीत कोणत्या पद्धतीने अंगीकारावा” यावरील विलासजी इंगोले ह्यांचे व्याख्यान आयोजित केले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे तसेच प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन माजी आमदार सुधाकरराव देशमुख यांची उपस्थिती राहतील.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सौ.नीताताई राजेंद्र ठाकरे ह्या पहिल्यांदाच महापौर झाल्या त्याबद्दल त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. यांच्यासहित इतरही मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. असे पांडुरंग वाकडे पाटील यांनी म्हटले आहे. कार्यक्रमाचे आयोजन तिरळे कुणबी सेवा मंडळाने केले असून यावेळी अध्यक्ष पांडुरंग वाकडे पाटील, महादेवराव बोराडे, सचिव नितीन हांडे आणि रमेश टाले परिश्रम घेत आहे. तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या वतीने समाजातील मान्यवर व जेष्ठ नागरिक यांचा सत्कार आयोजित केला असून सर्व समाज बांधव व शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे व सहकार्य करावे. असे आवाहन अध्यक्ष श्री. पांडुरंग वाकडे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे